नवी दिल्ली : मुजफ्फरनगरमध्ये होणाऱ्या रामलिला कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतला आहे. नवाजुद्दीन मुस्लीम असल्याने त्याला स्थानिक शिवसेनेने या कार्यक्रमापासून दूर राहण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने हा निर्णय घेतला आहे.


मुजफ्फनगरच्या बुढानामध्ये होणाऱ्या रामलिला कार्यक्रमात नवाजुद्दीन मारीच राक्षसाची भूमिका साकारणार होता. पण स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केवळ मुस्लीम असल्याच्या कारणावरुन त्याला या कार्यक्रमात सहभागी होण्यास विरोध केला.

दरम्यान, नवाजुद्दीने यामागे धार्मिक कारण नसल्याचं म्हटलं आहे. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो मुस्लीम असल्यानेच त्याला विरोध असल्याचं म्हटलं आहे.