मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्याच्या फटकळ ट्वीट्ससाठी ओळखला जातो. त्यातच आता अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर वर्माने हीन शब्दात टिपण्णी केली आहे. मद्यधुंद अवस्थेत राम गोपाल वर्माने केलेल्या फोनची ऑडिओ क्लीप अभिनेता विद्युत जमवालने जाहीर केली आहे.

जमवाल याला फोन करुन 'टायगर श्रॉफ ही मी पाहिलेली सर्वोत्तम स्त्री आहे' असं राम गोपाल वर्मा बरळल्याचं वृत्त आहे. विद्युतने ही ऑडिओ क्लीप सार्वजनिक केल्यानंतर राम गोपाल वर्माने माफी मागितली आहे.

https://twitter.com/RGVzoomin/status/851489122283814912

टायगर आणि विद्युत यांच्यापैकी मार्शल आर्ट्समध्ये उजवा कोण, असं ट्वीट करुन राम गोपाल वर्माने दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या ट्वीट्सची सरबत्ती सुरुच राहिल्याने विद्युतने ऑडिओ क्लीप ट्वीट करुन वर्मालाच एक फाईट दिली.

https://twitter.com/VidyutJammwal/status/851722344729116672

विद्युतने ऑडिओ क्लीप सार्वजनिक केल्यामुळे वरमलेल्या राम गोपाल वर्माने दोघांची माफी मागितली. त्याचप्रमाणे यापुढे व्होडका न पिण्याचंही आश्वासनही त्याने दिलं.

https://twitter.com/RGVzoomin/status/851795319516000256

'प्रत्येकाला मतस्वातंत्र्याचा अधिकार आहे. राम गोपाल वर्मा हा चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष कार्यरत असून सिनिअर व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे मनातलं बोलणं योग्य ठरणार नाही.' असं टायगरने 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

https://twitter.com/RGVzoomin/status/851824311790743552
'माझ्याबद्दल काहीतरी बोललं जातं, म्हणजे मी या क्षेत्रात एक पल्ला गाठला आहे. जर यामुळे त्यांना आनंद मिळत असेल, तर माझं काहीच म्हणणं नाही. कुठलीही प्रतिक्रिया देऊन मला माझ्या आई-वडिलांची मान शरमेनं खाली घालायची नाही.' असंही टायगर म्हणाला.

संबंधित बातम्या :


राम गोपाल वर्मांचं महिला दिनी वादग्रस्त ट्वीट


माफी मागा किंवा परिणामांना सामोरं जा, आव्हाडांचा वर्मांना इशारा


होळीला राम गोपाल वर्माचं पुन्हा एकदा आक्षेपार्ह ट्वीट