Ram Gopal Varma:  श्रद्धा वालकरच्या (Shraddha Murder Case) हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हदरला आहे. श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले.  या प्रकरणावर अनेक सेलिब्रिटी आणि नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन संताप व्यक्त करत आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मानं (Ram Gopal Varma) नुकतेच एक ट्वीट शेअर करुन श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. "तिच्या आत्म्यानं परत यावं अन् त्याचे 70 तुकडे करावेत' असं ट्वीट राम गोपाल वर्मानं शेअर केलं आहे. 


राम गोपाल वर्माचं ट्वीट


राम गोपाल वर्मानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'केवळ कायद्याच्या भीतीने क्रूर हत्या रोखता येत नाहीत. पण त्या घटनेचा बळी ठरलेल्या व्यक्तीच्या आत्म्यानं परत येऊन मारेकऱ्यांना मारले तर ते नक्कीच हे थांबवता येईल. देवाने याचा विचार करावा आणि आवश्यक ते करावे ही विनंती.' 






दुसऱ्या ट्वीटमध्ये राम गोपाल वर्मानं लिहिलं, 'तिच्या आत्म्याला शांती मिळण्याऐवजी परत यावे आणि त्याचे 70 तुकडे करावे' राम गोपाल वर्माच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.




राम गोपाल वर्मा हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो. सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टा व्हायरल होत असतात. राम गोपाल वर्मानं 'शिवा' या तेलुगु चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्याने पहिला हिंदी चित्रपट बनवला 'रंगीला', जो जबरदस्त हिट ठरला.


श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला अटक केल्यानंतर सहा महिन्यांनी ही अत्याचारी घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना श्रद्धाच्या शरीराचे काही अवशेष सापडले आहेत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Ketaki Chitale: 'सनातनी मुलांनो, तुम्हाला सुधरावं लागेल'; श्रद्धा हत्याकांड प्रकरणाबद्दल केतकी चितळेची पोस्ट