Ram Gopal Varma aur Urmila Matondkar:बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांच्याबद्दल अनेक वर्षांपासून चर्चा चालू आहेत. दोघे रिलेशनमध्ये होते, उर्मिलामुळे रामूंचा डिवोर्स झाला. अशा अनेक गोष्टींनी अनेक वर्षे गॉसिपला उधाण आलं होतं. पण या सगळ्यावर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आता खूप काळानंतर या विषयावर आपलं मौन सोडलंय. 

Continues below advertisement

राम गोपाल वर्मा अन् उर्मिला मातोंडकरच्या अफेअरच्या चर्चा

राम गोपाल वर्मा हे कायमच त्यांच्या धाडसी सिनेमांमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहिले आहेत. तरुण अभिनेत्रींसोबत त्यांची नावं जोडली जाणं हेही नवीन नाही. पण सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे उर्मिला आणि राम गोपाल वर्मा. 90 च्या दशकात उर्मिलाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि राम गोपाल वर्मांसोबत तिची जोडी कित्येकदा चर्चेत आली.

Continues below advertisement

दोघांनी ‘रंगीला’, ‘सत्या’, आणि ‘प्यार तूने क्या किया’ सारखे हिट चित्रपट एकत्र केले. उर्मिलाच्या स्टारडममध्ये रामूंचा मोठा वाटा असल्याचं सतत म्हटलं जातं. त्यामुळेही त्यांच्या equation विषयी उत्सुकता वाढली. दोघं शूटींगमध्ये एकत्र असताना अनेकवेळा त्यांच्या नात्यावर अफवा पसरल्या, पण दोघांपैकी कुणीही कधीच खुलासा केला नव्हता.

Ram Gopal Varma: काय म्हणाले राम गोपाल वर्मा ?

अलीकडेच झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांनी या जुन्या आरोपांवर आणि अफवांवर पहिल्यांदाच सविस्तर बोलले. उर्मिलासोबत रिलेशन असल्याच्या चर्चांवर उत्तर देताना ते म्हणाले, “उर्मिला ही अतिशय टॅलेंटेड आणि वर्सटाइल अभिनेत्री आहे. म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे काम करत राहिलो. मी अमिताभ बच्चनसोबतही बरंच काम केलं आहे, पण त्यांच्या बाबतीत कोणी नाती जोडत फिरत नाही.” त्यांच्या या वक्तव्याने त्यांनी रिलेशनच्या सगळ्या चर्चांना हलक्या शैलीत उत्तर दिलं.

फक्त मुलाखतीतच नाही, तर आपल्या ‘Guns and Thighs: The Story of My Life’ या पुस्तकातही त्यांनी उर्मिलाबद्दल मनमोकळेपणाने लिहिलं आहे. ‘मेरी जिंदगी की औरतें’ या विभागात त्यांनी उर्मिलाने त्यांच्यावर खोल छाप पाडली असल्याचं नमूद केलं आहे. त्यांनी स्पष्ट लिहिलंय की, “उर्मिला ही माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती होती, जिने माझ्यावर मोठा परिणाम केला.” राम गोपाल वर्मा यांच्या या वक्तव्यानंतर जुन्या आठवणी आणि अफवा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.