मुंबई : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी महिला दिनी वादग्रस्त ट्वीट केलं आहे. ''सर्व महिला पुरुषांना सनी लिओनीप्रमाणे आनंद देतील, अशी अपेक्षा करतो'', असं ट्वीट राम गोपाल वर्मा यांनी केलं.

https://twitter.com/RGVzoomin/status/839294572031164416

या वादग्रस्त ट्वीटनंतर राम गोपाल वर्मांना ट्वीटरवर ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी महिलांबद्दल आदर असल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

https://twitter.com/RGVzoomin/status/839403878659432449

सनी लिओनीबद्दलच्या ट्वीटचा नकारात्मक अर्थ घेतला. मात्र तिच्याबद्दल इतर महिलांपेक्षा जास्त आदर आहे, असं ट्वीट राम गोपाल वर्मांनी केलं.

दरम्यान राम गोपाल वर्मांच्या वादग्रस्त ट्वीटची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांच्या ट्वीटवरुन अनेकदा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अभिनेता टायगर श्रॉफबद्दल वादग्रस्त ट्वीट केलं होतं.