Ram Charan Hollywood Debut : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या ऑस्करमुळे (Oscars 2023) चर्चेत आहे. राम चरणच्या ब्लॉकबस्टर 'आरआरआर' (RRR) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. सिनेविश्वातील मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातदेखील या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याने बाजी मारली आहे. आता राम चरण भारतात परतला असून नुकत्याच एका मुलाखतीत त्याने हॉलिवूडच्या (Hollywood) सिनेमात काम करण्याबद्दल भाष्य केलं आहे.  


हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी राम चरण सज्ज (Ram Charam Hollywood Debut)


मीडियाला दिलेल्या मुलाखतीत राम चरण म्हणाला की, "हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास मी सज्ज आहे. पण याबद्दल बोलण्याची ही वेळ नाही. सध्या यावर काम सुरु असून लवकरच मी याबद्दल घोषणा करेन. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते". राम चरणने सिनेमाबद्दल अधिक माहिती दिली नसली तरी तो हॉलिवूडच्या सिनेमात झळकणार असल्याने त्याचे चाहते आनंदी असून ते आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 






भारतात येण्याआधी अमेरिकेतदेखील एका मुलाखतीत राम चरणने हॉलिवूड सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच 'आरआरआर'नंतर आणखी एक मोठा प्रोजेक्ट हातात असल्याबद्दल भाष्य केलं होतं. भारतात आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर राम आता जगभरातील चाहत्यांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल. 


राम चरणचे आगामी सिनेमे (Ram Charan Upcoming Project)


राम चरणचा 'आरआरआर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो 'RC15' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. हा सिनेमा जानेवारी 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सिनेमात राम चरण आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' या आगामी सिनेमातदेखील राम चरणची झलक पाहायला मिळणार आहे. 


हॉलिवूडच्या सिनेमात राम चरण हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीटसोबत स्क्रीन शेअर करु शकतो. तसेच टॉम क्रूझ, ज्युलिया रॉबर्ट्स आणि ब्रॅड पिट यांच्यासोबत काम करण्याची इच्छा राम चरणने व्यक्त केली आहे. 


संबंधित बातम्या


RRR 2 : 'आरआरआर 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ऑस्करनंतर राजामौलींची मोठी घोषणा