Rakul Preet Singh Wedding Functions : दाक्षिणात्य अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakhul Preet Singh) लवकरच आपला बायफ्रेंड जॅकी भगनानीसोबत (Jackky Bhagnani) लग्नबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, येत्या 21 फेब्रुवारीला रकुल आणि जॅकीचा लग्नसोहळा पार पडणार आहे. अभिनेत्रीच्या घरी प्री-वेडिंग पंक्शनला सुरुवात झाली आहे. 


रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचा लग्नसोहळा 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात पार पडणार आहे. अभिनेत्रीच्या घरी आता प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीने तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जॅकी भगनानी हा लोकप्रिय सिनेनिर्माता आहे. 


रकुल प्रीत सिंहच्या घरी पार पडलं अखंड पाठ


रकुल प्रीत सिंहने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या घरी नुकतचं अखंड पाठ पार पडलं आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. तिने जांभळ्या रंगाची ओढणी डोक्यावर घेतली आहे. अभिनेत्रीच्या हॅपी सेल्फीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोवरुन अभिनेत्रीच्या घरी लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अभिनेत्रीचा हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे.



मुंबईत होणार रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानीचं वेडिंग रिसेप्शन


रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी आपल्या कुटुंबियांसोबत गोव्यात लग्नबंधनात अडकणार आहे. 3-4 दिवस त्यांचा लग्नसोहळा चालणार आहे. त्यानंतर सिनेसृष्टीतील मंडळींच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचं ग्रँड वेडिंग होणार आहे. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एकमेकांना पूर्णपणे जाणून घेतल्यानंतर आता त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे.






न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानीने आधी मिडिल ईस्टमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भाषणानंतर त्यांनी त्यांच्या लग्नाचं ठिकाण बदललं. देशातच लग्न करण्यात त्यांनी निर्णय घेतला. अभिनेत्रीच्या लग्नाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Rakul Preet Singh Wedding : वयाच्या 33 व्या वर्षी रकुल प्रीत सिंह अडकणार लग्नबंधनात; बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत घेणार सात फेरे? वेडिंग डेट समोर