Rakhi Sawant Third Wedding : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा 'ड्रामा क्वीन' राखीची पर्सनल लाईफ चर्चेत आली आहे. राखी सावंत पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. राखी सावंत पाकिस्तानी अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राखी सावंतने पाकिस्तानी अभिनेत्याचं लग्नासाठीचे प्रपोजल मान्य केल्याचं सांगितलं जात आहे. ती आता पाकिस्तानी व्यक्तीसोबत लग्न करुन नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. राखी सावंत सध्या पाकिस्तानात आहे. ती तेथील फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे.


राखी सावंतला तिसऱ्यांदा लग्न करणार


अभिनेत्री राखी सावंत सध्या पाकिस्तानात फिरत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, तिने पाकिस्तानात तिसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या राखी सावंत तिची मैत्रिण हानिया आमिरसोबत पाकिस्तानात फिरण्याचा आनंद घेत आहे. राखीचे पाकिस्तानातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यादरम्यान, राखीने चाहत्यांना एक गूड न्यूज दिली आहे. राखी लवकरच लग्न करणार असल्याचं तिने चाहत्यांना सांगितलं आहे. लग्न करण्यासाठी राखी पाकिस्तानला गेल्याचं ही बोललं जात आहे.


राखीचा होणारा पती आहे तरी कोण?






लग्नापासून हनीमूनपर्यंत राखीचं फूल प्लॅनिंग


एका पाकिस्तानी व्यक्तीने राखीला प्रप्रोझ केलं आहे. राखीने या व्यक्तीसोबत लग्नापासून हनीमूनपर्यंत पूर्ण प्लॅनिंग केलं आहे. राखीने इंस्टाग्रामवर चाहत्यांना तिला आलेल्या मॅरेज प्रपोजलबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने सांगितलं की, ती डोडी खान (Dodi Khan) याच्यासोबत लग्न करणार आहे. राखी सावंतचं हे तिसरं लग्न असेल. राखीचं नाव याआधी अनेक व्यक्तींसोबत जोडलं गेलं आहे, पण तिला खरं प्रेम मिळालेलं नाही. दोन वेळा चुकीच्या लग्नबंधनात अडकलेल्या राखीने आता पुन्हा एकदा तिचा जोडीदार निवडला असून ती त्याच्यासोबत पाकिस्तानात लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. राखी सावंतचा होणारा पती डोडी खान कोण आहे, ते जाणून घ्या.


कोण आहे डोडी खान?


सध्या राखी सावंतचं पाकिस्तानी व्यक्ती डोडी खान याच्याशी जोडलं जात आहे. 


डोडी खान हा एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेता आणि मॉडेल आहे.


राखी सावंत आणि डोडी खान यांची भेट ऑनलाइनझाली.


डोडी खान सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहे.


राखी सावंतने डोडी खानसोबत लग्नापासून ते हनिमूनपर्यंत सर्व काही प्लॅन केलं आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या


Lakshmichya Pavlani : अद्वैत नयनाला कलाची माफी मागायला लावणार, लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत पुढे काय घडणार?