Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या चर्चेत आहे. पण यावेळी ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. राखीची फसवणूक झाली असून तिची कोट्यवधी किंमतीची कार, पैसे आणि फोन घेऊन ड्रायव्हर फरार झाला आहे. त्यामुळे आता 'ड्रामा क्वीन'वर रिक्षाने फिरण्याची वेळ आली आहे. 


राखी सावंतचा रिक्षाने प्रवास करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणत आहे,"उत्तरप्रदेशात राहणारा माझा ड्रायव्हर पप्पू यादव कुठे दिसला तर त्याला चप्पालांचा हार घाला. तो माझे पैसे, फोन आणि कोट्यवधी किंमतीची गाडी घेऊन फरार झाला आहे". 


राखी पुढे म्हणते,"चांद्रयान 3'च्या यश्स्वी प्रक्षेपणानंतर माझ्या आयुष्यात आता संकटांचं वादळ आलं आहे. मी आता माझा ड्रायव्हर पप्पू यादव विरोधात ओशिवारा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी जात आहे". राखीने तिच्या इंस्टाग्रामवरदेखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे.






राखीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणत आहे,"माझ्या ड्रायव्हरने पैसे चोरी केले आहेत. फोन आणि बीएमडबल्यू कार घेऊन तो फरार झाला आहे. माझ्याकडे त्याचं आर्ध कार्ड नाही. गरीब व्यक्ती म्हणून मी त्याच्यावर विश्नास ठेवला होता. पण आता मीच अडचणीत आले आहे". 


राखी सावंतबद्दल जाणून घ्या... (Who Is Rakhi Sawant)


बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंतचं खरं नाव नीरू भेडा असं आहे. मुंबईत जन्मलेल्या राखीचं बालपण अत्यंत गरीबीत गेलं आहे. 'मोहब्बत है मिर्ची' या गाण्यामुळे राखी रातोरात सुपरस्टार झाली आहे. 'मस्ती' आणि 'मैं हूं ना' या सिनेमांतदेखील तिने काम केलं आहे. राखी सावंतने बिग बॉसदेखील गाजवलं आहे. तसेच 'राखी का स्वयंवर' हा कार्यक्रमही तिने केला होता. सोशल मीडियावरदेखील राखी चांगलीच अॅक्टिव्ह असते. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती कायम चर्चेत असते. 


राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या पतीमुळे अर्थात आदिल खान दुर्रानीमुळे चर्चेत आहे. आदिल सध्या तुरुंगात असून राखीला धमक्या देत आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राखी आणि आदिलचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. आदिलसोबत घटस्फोट घेण्यानंतर राखी पुन्हा एकदा लग्नाचा विचार करणार असल्याची चर्चा आहे. 


संबंधित बातम्या


Rakhi Sawant : 'Chandrayaan 3'च्या यशस्वी उड्डाणावर राखी रावंतची प्रतिक्रिया, म्हणाली,"माझ्यामुळे लॉन्च झालं"