Rakhi Sawant Blamed Adil Khan : बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंतने (Rakhi Sawant) आता आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) नवे आरोप केले आहेत. राखी म्हणाली आहे की,"आदिल खान दुर्रानीने मला मारण्याचा कट रचला आहे. तो तुरुंगात असल्याने त्याने एका व्यक्तीला मला मारण्याची सुपारी दिली आहे". 


राखीचा पती आदिल सध्या म्हैसूर तुरुंगात आहे. राखी सावंतला मारहाण केल्याप्रकरणी तो पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान राखी सावंतच्या नव्या दाव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत राखी सावंत म्हणाली आहे की,"शत्रूंपासून बचाव करण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करत आहे. आदिल मला मारण्याचा कट रचत आहे. तो तुरुंगात असल्याने त्याने एका व्यक्तीला मला मारण्याची सुपारी दिली आहे". 


राखीला आदिल रोज फोन करतो...


राखी सावंत पुढे म्हणाली,"अल्ला माझ्या प्रार्थनेचा नक्कीच स्वीकार करेल. आदिल मला मारू शकत नाही. माझा बदला घेण्यासाठी त्याला मला मारायचं आहे. मला तो दररोज न चुकता फोन करतो आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला परत घेऊन जा, असं सांगतो. त्यावर मी त्याला सांगितलं आहे की,"मी तुला माफ केलं आहे...पण, माझ्यापासून दूर राहा". 


राखी सावंतला एक व्हॉईस नोट मिळाली आहे. यामध्ये एक व्यक्ती म्हणत आहे की,"मला जे कळालं आहे त्यानुसार, आदिलने तुला मारण्याचा कट रचला आहे. तसेच या महिन्याच्या शेवटी आदिलला जामीन मिळू शकतो, असा दावाही त्या व्यक्तीने केला आहे. 


आदिलने राखीला दिलेली धमकी (Adil Khan Durrani threatened Rakhi Sawant)


राखी सावंतने गेल्या काही दिवसांपूर्वी आदिलची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान आदिल खान तिला म्हणालेला,"आज मी तुरुंगात आहे. यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. आर्थर रोड तुरुंगासारखं घाणेरडं तुरुंग मी आजवर पाहिलेलं नाही. इथे मी भांडी घासली आहेत. लोकांसाठी चहा बनवला आहे. त्यांचे पाय चेपून दिले आहेत. मला मारहाणही झाली आहे. यासर्व गोष्टींचा बदला घ्यायला मी पुन्हा येईन. लवकरच माझी सुटका होईल. मग बघ तुझं काय होईल". मारहाण, फसवणूक आणि लैंगिक अत्याचार करायचा, असा आरोपही राखी सावंतने आदिलवर केला आहे. 


संबंधित बातम्या


Rakhi Sawant ON Adil Khan : आदिलने तुरुंगातून राखी सावंतला दिली धमकी; म्हणाला, "मी पुन्हा येईन आणि..."