Rakeysh Omprakash Mehra: हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीत ओमप्रकाश मेहरा (Rakeysh Omprakash Mehra) यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या 'रंग दे बसंती' (Rang De Basanti) आणि 'भाग मिल्खा भाग' (Bhaag Milkha Bhaag) या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या 'द स्ट्रेंजर इन द मिरर' (The Stranger In The Mirror) या पुस्तकामध्ये आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या कळाबद्दल तसेच स्ट्रगल स्टोरीबाबत लिहिलं आहे.
काय म्हणाले राकेश ओमप्रकाश मेहरा?
राकेश ओमप्रकाश मेहरा यांची स्टोरी ही एका चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे, असं म्हणता येईल. एका मुलाखतीमध्ये राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या संघर्षाबाबत सांगितलं. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'डोळ्यात हजारो स्वप्ने आणि खिशात थोडे पैसे घेऊन मी दिल्लीहून मुंबईला निघालो. ट्रेनमध्ये मी दिल्ली ते मुंबई प्रवास केला, पण ट्रेनचा तिकिट चेकर येऊन मला पकडेल अशी भीती वाटत होती म्हणून मी ट्रेनच्या शेवटच्या बोगीजवळच्या टॉयलेटजवळ जाऊन बसलो. त्यावेळी राजधानीचे तिकीट 460 रुपये असायचे, पण मी 100 रुपये घेऊन प्रवास करत होतो.'
राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'रंग दे बसंती', 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटांसोबतच मिर्झिया, दिल्ली-6, तुफान यांसारख्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांचे अनेक चित्रपट हिट ठरले. एका मुलाखतीमध्ये राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सांगितले होते की, अभिनेत्री सोनम कपूरनं 11 रुपये मानधन घेतलं होतं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: