Raju Srivastav Death: अभिनेता आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav Death) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर एम्स रुग्णालयाचत उपचार सुरु होते. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी मुंबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांना बराच संघर्ष करावा लागला.
असा होता राजू श्रीवास्तव यांचा खडतर प्रवास
25 डिसेंबर 1963 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे राजू श्रीवास्तव यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे प्रसिद्ध कवी होते. लहानपणापासूनच राजू श्रीवास्तव यांना मिमिक्रीची आवड होती. शाळेतील शिक्षकांची तसेच विविध सेलिब्रिटींची मिमिक्री राजू हे करत होते. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी 1988 मध्ये राजू हे मुंबईमध्ये शिफ्ट झाले. पण मुंबईमध्ये त्यांना स्ट्रगल करावा लागला.
एका मुलाखतीमध्ये राजू यांनी सांगितलं होतं की, मुंबईमध्ये ते रिक्षा चालवत होते. रिक्षा चालक असताना रिक्षात बसलेल्या प्रवाशांचे ते मिमिक्री करुन मनोरंजन करत होते. तसेच बर्थ-डे पार्टीमध्ये देखील ते स्टँडअप कॉमेडी करत होते. या स्टँडअप कॉमेडिच्या शोसाठी ते 50 रुपये मानधन घेत होते. त्यानंतर काही वर्षांनी विविध स्टेज शोमधून राजू हे प्रेक्षकांच्या भेटीस आले. 1993 मध्ये राजू आणि शिखा यांचे लग्न झाले. त्यांना मुलगी अंतरा आणि मुलगा आयुष्मान ही दोन मुलं आहेत.
कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांनी अनेक हिट चित्रपट आणि कार्यक्रमांमध्ये केलं काम
राजू श्रीवास्तव यांनी अनेक चित्रपट आणि कार्यक्रमांमध्ये काम केलं. सलमान खानच्या मैने प्यार किया या चित्रपटातील त्यांच्या विनोदी अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. 'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळाली. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असंही राजू श्रीवास्तव यांना म्हणलं जातं. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. विविध सेलिब्रिटींची मिमिक्री राजू श्रीवास्तव करत होते.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :