जयपूर : वाल्मिकी समाजावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानच्या कोतवाली गावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजस्थानातील सिनेमागृहाबाहेर 'टायगर जिंदा है' चित्रपटाचे पोस्टर्स जाळण्यात आले, त्याचप्रमाणे घोषणाबाजी करण्यात आली. अशोक पवार नामक युवकाच्या तक्रारीनंतर पोलिसात भादंवि कलम 153 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका मुलाखतीत सलमान खानने त्याचं नृत्यकौशल्य सांगताना जातिवाचक शब्दाचा वापर केला होता. शिल्पा शेट्टीनेही ती घरी कशी दिसते, हे सांगण्यासाठी याच शब्दाचा वापर केल्याचा आरोप आहे.
सलमान आणि शिल्पाच्या वक्तव्यामुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे वाल्मिक समाज चांगलाच आक्रमक झालेला दिसत आहे.
वाल्मिकी समाजाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी, सलमान-शिल्पावर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Dec 2017 10:41 AM (IST)
सलमान खानने त्याचं नृत्यकौशल्य सांगताना जातिवाचक शब्दाचा वापर केला होता. शिल्पा शेट्टीनेही ती घरी कशी दिसते, हे सांगण्यासाठी याच शब्दाचा वापर केल्याचा आरोप आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -