मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या मोस्टअवेटेड 2.0 सिनेमाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. पण आता या सिनेमाचा टीझर लीक झाल्याचं समोर आलं आहे. ट्रेड अनेलिस्ट रमेश बाला यांनी याबाबतचं ट्वीट करुन माहिती दिली आहे.

रमेश बाला यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँण्डलवर ट्वीट केलंय की, “टू पॉईंट झीरोचा टीझर ऑनलाईन लीक झाल्याचं पाहून धक्काच बसला. हा टीझर लीक करणाऱ्यांवर निर्माते कठोर कारवाई करतील. मीडिया वृत्तानुसार, डॅमेज कंट्रोलसाठी सिनेमाचे निर्माते लवकरच याचा टीझर लॉन्च करतील.”


रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या 2.0 चा टीझर अद्याप लॉन्च केला नाही. पण सिनेमाचे पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. हा सिनेमा रोबोटचा सिक्वेल असल्याचं सांगितलं जात आहे. या सिनेमात अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रजनीकांत यांचा हा सिनेमा 27 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. याच्या प्रदर्शनानंतर हा सिनेमा बाहुबलीचाही विक्रम मोडित काढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन शंकर यांनी केलं असून, सिनेमाचं बजेट तब्बल 400 कोटी रुपये आहे. या सिनेमात अनेक ज्यूनिअर आर्टिस्टही असल्याचे सांगितलं जात आहे.

लीक झालेला टीझर पाहा