Rajkummar-Patralekhaa Marriage : राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) 15 नोव्हेंबर 2021 रोजी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. 11 वर्ष एकत्र राहिल्यानंतर या जोडप्याने शेवटी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. फराह खान, हंसल मेहता, अनुराग बसू, अनुभव सिन्हा आणि अभिनेता साकिब सलीम व्यतिरिक्त दोघांच्या खास मित्रांनी लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. 


राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या लग्नसोहळ्यात उपस्थित राहू न शकलेल्यांना त्यांनी मिठाईची खास भेट पाठवली आहे. मिठाईसोबत त्यांनी एक वैयक्तिक संदेशदेखील पाठवला आहे. चंदीगढमध्ये दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. 2010 पासून एकत्र असलेल्या राजकुमार आणि पत्रलेखाने चंदीगढमधील ओबोरॉय सुखविलास रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा पार पडला.


राजकुमार राव आणि पत्रलेखाचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. चाहते कमेंट्स करत दोघांचे कौतुक करत आहेत. नुकतेच राजकुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले होते. त्या फोटोंमध्ये दोघेही खूप खूश दिसत होते.





 


राजकुमारचे आगामी सिनेमे
 
राजकुमार राव नुकताच पत्रलेखासोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. राजकुमार रावचे अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. राजकुमार लवकरच हंसल मेहतांनी दिग्दर्शित केलेल्या 'स्वागत' सिनेमात दिसणार आहे. तसेच हर्षवर्धन कुलकर्णींच्या आगामी 'बधाई दो' सिनेमातदेखील भूमी पेडनेकरसोबत दिसणार आहे. 'हिट', 'सेकंड इंनिंग्स', 'लाइफ इन अ मेट्रो सीक्वल' आणि 'भीड' हे राजकुमारचे आगामी सिनेमे आहेत. 


संबंधित सिनेमे


Rajkummar Rao आणि Patralekhaa हनीमूनला जाणार नाहीत... कारण ऐकूण थक्क व्हाल....


Rajkummar Rao and Patralekhaa: राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचे लग्नानंतरच्या पार्टीतले 'हे' फोटो पाहिलेत का?


Patralekhaa Mangalsutra : पत्रलेखा - राजकुमारचा एअरपोर्ट लूक; पत्रलेखाच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha