Rajinikanth and Kamal Haasan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) आणि अभिनेते  रजनीकांत  (Rajinikanth) यांचा चहता वर्ग मोठा आहे. रजनीकांत आणि कमल हासन यांनी साऊथ चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील विशेष लोकप्रियता मिळवली आहे. नुकतेच कमल हासन आणि रजनीकांत  यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रजनीकांत आणि कमल हासन यांनी 21 वर्षानंतर एकाच स्टुडिओमध्ये शूटिंग केले आहे. 


कमल हासन आणि रजनीकांत यांचे फोटो व्हायरल


लायका प्रॉडक्शन या ट्विटर अकाऊंटवरुन कमल हासन आणि रजनीकांत यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोला कॅप्शन देण्यात आले, "कमल हासन आणि रजनीकांत यांनी 21 वर्षांनंतर एकाच स्टुडिओमध्ये त्यांच्या इंडियन-2 आणि थलाइवर 170 या  चित्रपटांचे शूटिंग केले." लायका प्रॉडक्शनच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या कमल हासन आणि रजनीकांत यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


रजनीकांत यांच्या 'थलाइवर 170' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन टी.जी. ज्ञानवेल यांनी केलं आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबतच अमिताभ बच्चन देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 'थलाइवर 170' या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन आणि रजनीकांत 33 वर्षानंतर स्क्रिन शेअर करणार आहेत.






कधी रिलीज होणार 'इंडियन 2'?


कमल हासन यांचा इंडियन-2 हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. 'इंडियन 2' हा चित्रपट 3 नोव्हेंबर 2023 रोजी  प्रदर्शित होणार आहे. 


कमल हासन यांचे आगामी चित्रपट


कमल हे कल्की 2898 AD या चित्रपटामध्ये देखील दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तसेच त्यांचा ठग लाईफ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संबंधित बातम्या:


Kamal Haasan : कमल हासनच्या 'इंडियन 2'ची पहिली झलक समोर; 'या' भूमिकेत झळकणार सुपरस्टार