Chahat Pandey: मध्य प्रदेशातील दमोह विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या महिला उमेदवार आणि अभिनेत्री चाहत पांडे (Chahat Pandey) या सध्या चर्चेत आहेत. चाहत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चाहत या 'सिम्बा' चित्रपटातील 'आंख मारे' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.


'आंख मारे' गाण्यावर चाहत पांडे यांचा डान्स


मध्य प्रदेशातील दमोह विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या (आप) महिला उमेदवार चाहत पांडे यांच्या व्हायरल झालेल्या एक मिनिट सहा सेकंदाच्या व्हिडीओमध्ये त्या डान्स करताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ कधीचा आहे? ही माहिती अजून समोर आलेली नाही.  


नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


चाहत पांडे यांच्या डान्सच्या व्हिडीओवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहे. काही लोकांनी या व्हिडीओला कमेंट करुन चाहत पांडे यांना ट्रोल देखील केलं आहे. 'हे बघा, आम आदमी पार्टीचे विधानसभेच्या उमेदवार, ज्यांना आमदार होऊन जनतेची सेवा करायची आहे. हे त्यांचे खरे रूप आहे का?", असं म्हणत काही नेटकऱ्यांनी चाहत पांडे यांना ट्रोल केलं.


काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, राजकारणात येण्यापूर्वी चाहत पांडे या छोट्या पडद्यावरील अभिनेत्री होत्या, मग त्यांनी डान्स करण्यात काय हरकत आहे? तर काही लोक, "हे योग्य नाही." असं म्हणत आहेत. 






जाणून घ्या चाहत पांडे यांच्याबद्दल


चाहत पांडे यांनी काही मलिकांमध्ये काम केलं. त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी पवित्र बंधन या टीव्ही शोमधून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. तेनालीरामन, राधा कृष्णन, सावध इंडिया, नागिन-2, दुर्गा-माता की छाया, अलादीन आणि क्राइम पेट्रोल  या मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं. सध्या त्या 'नाथ जेवर या जंजीर' या टीव्ही शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत त्या महुआ ही भूमिका साकारत आहे.


मध्य प्रदेशातील दमोह येथे राहणाऱ्या चाहत पांडे या जून महिन्यामध्ये आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. भाजपने ज्येष्ठ नेते जयंत मलाय्या यांच्या विरोधात दमोहमधून चाहत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी काँग्रेसचे विद्यमान आमदार अजय टंडन यांचाही या लढतीत सहभाग आहे.






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Animal Trailer out: जबरदस्त अॅक्शन आणि ड्रामा; रणबीरच्या 'अॅनिमल'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज, बॉबी देओलच्या खतरनाक लूकनं वेधलं लक्ष