मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या तामिळ सिनेमा कबालीने उत्तर अमेरिकेत फक्त प्रीमियरद्वारे 20 लाख डॉलरपेक्षा जास्त कमाई केली आहे.
कबालीच्या वितरणाची जबाबदारी असलेल्या सिनेगॅलॅक्सी इंकचे सह संस्थापक संजय दुसारी यांनी आयएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली की, उत्तर अमेरिकेत कोणत्याही भारतीय सिनेमाची ही सर्वात मोठी ओपनिंग असून या सिनेमाने तब्बल 20 लाख डॉलरहून जास्त कमाई केली आहे. यात कबालीच्या तामिळ आणि तेलुगू भाषेतील शोजचा समावेश आहे.
कबाली हा सिनेमा अमेरिका आणि कॅनडात 400 हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला असून या सिनेमाने एका दिवसातच रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
रजनीकांतची फिल्म असल्यामुळेच कबाली एवढी कमाई करत असल्याचे मत काही सिनेअभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
कबालीमध्ये रजनीकांतसोबत राधिका आपटे ही मराठमोळी अभिनेत्रीही मुख्य भुमिकेत आहे.