मुंबई : नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे त्याबद्दल बोलावं अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अभिनेते नाना पाटेकरांच्या फेरीवाल्यासंबंधी वक्तव्याचा समाचार घेतला. मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केलं. नानाला वाटतं तो चंद्रावरुन पडलाय, जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती तेव्हा नाना पाटेकर बोलले नाही, तेव्हा मनसेने लढा दिला असं म्हणत राज ठाकरेंनी नानाची मिमिक्रीही केली.
फेरीवाल्यांच्या मारहाणीनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. दक्षिणेतील कलाकार रस्त्यावर उतरुन स्वत:च्या प्रांतासाठी लढतात, तसंच नानानं महाराष्ट्रासाठी लढावं असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.
LIVE UPDATES :
LIVETV : आंदोलनात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, ज्यांच्यावर केसेस पडल्या, त्या सर्वांचं अभिनंदन : राज ठाकरे
LIVETV : पोलिसांनी आमचं संरक्षण करायचं, तर आमची मुलं जाऊन पोलिसांचं संरक्षण करत आहेत : राज ठाकरे
LIVETV : राज ठाकरेंकडून नाना पाटेकरांची मिमिक्री
LIVETV : माहित नाही त्या गोष्टींमध्ये चोमडेपणा करायचं बंद करावं नाना पाटेकरांनी : राज ठाकरे
नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Nov 2017 08:19 PM (IST)
नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे त्याबद्दल बोलावं अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अभिनेते नाना पाटेकरांच्या फेरीवाल्यासंबंधी वक्तव्याचा समाचार घेतला. मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -