Raghav Chadha Parineeti Chopra Net Worth : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा नुकताच नवी दिल्लीत साखरपुडा झाला आहे. परिणीती आणि राघव दोघेही आपापल्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. जाणून घ्या त्यांच्या संपत्तीबद्दल... 


राघव चड्ढा यांच्या संपत्तीबद्दल जाणून घ्या... (Raghav Chadha Net Worth) 


राघव चढ्ढा हे राजकारणी असण्यासोबत एक चार्टर्ड अकाउंटंटदेखील आहेत. त्यांनी डेलॉइट, श्याम मालपाणी आणि ग्रँट थॉर्नटन यांसारख्या अकाउंटन्सी फर्ममध्ये काम केलं आहे. डिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 50 लाख आहे. राघव 2012 साली आपमध्ये सामील झाले आणि सर्वात तरुण राज्यसभा सदस्य म्हणून ते ओळखले जातात. राघवकडे मारुती स्विफ्ट डिझायर आणि 90 ग्रॅमचे दागिने आहेत. याची किंमत सुमारे 4,95,000 रुपये आहे. त्यांच्याकडे 37 लाख रुपयांचं घरही आहे.


कोट्यवधींची मालकीण परिणीती चोप्रा (Parineeti Chopra Net Worth)


परिणीती चोप्राची एकूण संपत्ती 60 कोटींच्या आसपास आहे. सिनेमे आणि जाहिरातींच्या माध्यमातून ती जास्तीत जास्त कमाई करते. मुंबईत तिचं आलिशान घर आहे. तसेच ऑडी ए 6, जगुआर एक्सजेएल आणि ऑडी क्यू 5, जगूआर एक्सजेएल सारख्या गाड्यादेखील तिच्याकडे आहेत. 


परिणीती आणि राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण घेतलं आहे. अनेकदा मुंबईत ते एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. मुंबई किंवा दिल्ली विमानतळावरदेखील ते दिसून आले आहेत. 13 मे 2023 रोजी शाही थाटात त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. 






राघव चढ्ढा परिणीतीला पहिल्यांदा कुठे भेटले? (Parineeti Chopra Raghav Chadha Love Story)


परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पंजाबमध्ये एकमेकांना पहिल्यांदा भेटले. पंजाबमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असताना परिणीती राघवला पहिल्यांदा भेटली. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या सहा महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत असे म्हटले जात आहे. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. आता परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.


संबंधित बातम्या


Parineeti Raghav Engagement : खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक; परिणीती आणि राघवचा रॉयल साखरपुडा