मुंबई : सलमान खानच्या बहुप्रतीक्षित 'रेस 3' चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचा व्हिडिओ रिलीज झाला आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे सलमान खान त्यात झळकणार तर आहेच, मात्र गाणं लिहिलंही त्यानेच आहे.


सलमान खानला आतापर्यंत हँगओव्हर, जुम्मे की रात, बेबी को बेस पसंद है, जग घुमेया यासारखी गाणी गाताना आपण ऐकलं आहे. मात्र सलमान पहिल्यांदाच गीतकाराच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.

सेल्फिश गाण्याच्या व्हिडिओत सलमान आणि बॉबी देओल अशा दोघांसोबत जॅकलिन रोमान्स करताना दिसणार आहे. पाकिस्तानी गायक आतिफ असलम आणि रोमानियन अभिनेत्री युलिया वंतूर यांनी हे गाणं गायलं आहे.

'एक बार सेल्फिश होऊन स्वतःसाठी जगा ना' असं कॅप्शन देत सलमान खानने या गाण्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.


'ये रेस जिंदगी की रेस है, किसी की जिंदगी लेकर ही खत्म होगी' या सलमानच्या डायलॉगने 'रेस 3' च्या ट्रेलरला सुरुवात होते. 'परिवार के लिए किसी की जान भी लेनी पड़ेगी तो पीछे नहीं हटेंगे.' असं सलमान म्हणताच 'गुस्से में लिया गया फैसला हमेशा नुकसान पहुंचाता है, इसलिए मैंने पहले फैसला लिया और अब गुस्सा हो रहा हूं.' असं अनिल कपूर म्हणताना दिसतो.

'रेस 3' मध्ये सलमानसोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेत असून बॉबी देओल मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. जॅकलिन फर्नांडिस आणि डेझी शाह या हिरोईन्सच्या वाट्यालाही अनेक साहसी दृश्यं आहेत. साकिब सलीम आणि फ्रेडी दारुवालाही सिनेमात झळकणार आहेत.

ये जिंदगी की रेस है... सलमानच्या 'रेस 3'चा ट्रेलर रिलीज

रेमो डिसूझाने सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 15 जूनला रेस 3 प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हिडिओ :