Dhokha Round D Corner Trailer Out : बॉलिवूड अभिनेता आर माधवन लवकरच 'धोका : राऊंड डी कॉर्नर' (Dhokha Round D Corner Trailer Out) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'च्या (Rocketry : The Nambi Effect) यशानंतर अभिनेता आर माधवन (R Madhavan) त्याचा पुढचा चित्रपट 'धोका’ घेऊन मोठ्या पडद्यावर परतत आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. 23 सप्टेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता आर माधवन, अपारशक्ती खुराना, 'द काश्मीर फाइल्स' फेम दर्शन कुमार आणि अभिनेत्री खुशाली कुमार दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे खुशाली कुमार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.


‘धोका : राऊंड डी कॉर्नर’चा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे. पुन्हा एकदा माधवन चाहत्यांना आणि प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी देणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.


पाहा ट्रेलर :



चित्रपटाच्या या ट्रेलरची सुरुवात आर माधवन आणि खुशाली कुमार यांच्यापासून होते. दोघेही एक विवाहित जोडी आहेत. मात्र, जेव्हा अपारशक्ती खुराना प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात सर्वकाही बदलून जाते. यात अपारशक्ती खुराना खलनायकाच्या मिकेत दिसत आहे. तर, दर्शन कुमार एका पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. ट्विस्ट-टर्न आणि सस्पेन्स ड्रामाने भरलेल्या या चित्रपटातील सर्व पात्रांच्या ग्रे शेड्स यात पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक आर माधवनला पुन्हा एकदा सस्पेन्स थ्रिलरमध्ये पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.


‘रॉकेट्री’ने गाजवलं मनोरंजन विश्व!


याआधी आर माधवन ब्रीद सीरिजमध्ये अतिशय उत्कंठावर्धक लूकमध्ये दिसला होता. आर माधवनच्या ‘ब्रीद’मधील या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता त्याचा आगामी चित्रपट 'धोका : राऊंड डी कॉर्नर’ पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘धोका : राऊंड डी कॉर्नर’ 23 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आर माधवन यापूर्वी ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' हा चित्रपट आर माधवनचा ड्रीम प्रोजेक्ट होता. हा चित्रपट इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट प्रचंड चर्चेत आला होता. तर, प्रदर्शित झाल्यानंतरही या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले होते.


संबंधित बातम्या


Rocketry OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आर. माधवनचा 'रॉकेट्री' ओटीटीवर होणार रिलीज


Dhokha: Round D Corner :  'धोका: राऊंड डी कॉर्नर' चा जबरदस्त टीझर रिलीज; आर. माधवन, खुशाली कुमार अन् अपारशक्ती खुराणा प्रमुख भूमिकेत