PVR INOX Monthly Subscription Pass: कोरोनाकाळात अनेक लोक ओटीटीवर (Ott) चित्रपट बघत होते. कोरोनानंतर प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये खेचून आणणे हे मल्टीप्लेक्सच्या मालकांसाठी आणि चित्रपट निर्मात्यांसाठी चॅलेंज होते. पण  कोरोनानंतर विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. ते पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली.  काही मल्टीप्लेक्स कंपन्यांनी चित्रपटाच्या तिकिटांच्या किंमतींवर ऑफर्स देण्यात सुरुवात केली. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त देखील प्रेक्षकांना 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. आता  PVR INOX ने  सिनेप्रेमींसाठी एका खास पासची घोषणा केली आहे. या पासमध्ये प्रेक्षकांना एका महिन्यामध्ये दहा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. या पासची किंमत काय? या पासचे  सबस्क्रिप्शन कसे मिळवायचे? याबाबत जाणून घ्या... 


पासची किंमत


‘पीव्हीआर आयनॉक्स पासपोर्ट’  या पासची घोषणा पीव्हीआर आयनॉक्सने केली आहे. या पासची किंमत 699 रुपये आहे. या मंथली सबस्क्रिप्शन पासमध्ये तुम्ही 10 चित्रपट पाहू शकता. या पासचा वापर तुम्ही एक महिना करु शकता. सोमवार ते गुरुवार या दरम्यान तुम्ही या पासचा वापर करु शकता. वीकेंडला तुम्ही या पासचा वापर करु शकत नाही.


कसा मिळणार पास? 


‘पीव्हीआर आयनॉक्स पासपोर्ट’ हा पास  तुम्हाला PVR INOX च्या अॅपवर मिळेल. तसेच तुम्ही  PVR INOX च्या वेब साइटवरुन देखील हा पास घेऊ शकता. 


पीव्हीआर सिनेमा या ट्विटर अकाऊंटवरुन ‘पीव्हीआर आयनॉक्स पासपोर्ट’ या पासची घोषणा करण्यात आली होती. या ट्वीटमध्ये लिहिलं होतं,  "आम्हाला वाटते की, भारतातील चित्रपट प्रेमी प्रत्येक चित्रपट पाहण्याच्या स्वातंत्र्यास पात्र आहेत. आम्ही हे घडवून आणत आहोत, फक्त तुमच्यासाठी, कारण आमच्यासाठी तुमची निवड, तुमचे स्वातंत्र्य, तुमचे मत महत्त्वाचे आहे."






इतर महत्वाच्या बातम्या:


Singham Again : 'सिंघम अगेन' सिनेमातील दीपिका पदुकोणचा खतरनाक लूक समोर; रोहित शेट्टी म्हणाला,"सर्वात क्रूर ऑफिसर..."