Pushpa 2 Box Office: 2024 च्या शेवटच्या महिन्यात रिलीज झालेल्या 'पुष्पा 2'नं (Pushpa 2) तेलगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Telugu Film Industry) इतिहास रचला आहे.  बॉलिवूडच्या दिग्गजांनाही पुष्पा 2 (Pushpa 2 The Rule) नं पाणी पाजलं आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर पुष्पा 2 नं संपूर्ण साऊथ फिल्म इंडस्ट्री (South Film Industry) आणि बॉलिवूड चित्रपटांसह भारतीय चित्रपटांच्या इतिहासात नवे रेकॉर्ड रचले आहेत. पुष्पाच्या बॉक्स ऑफिसचे दररोज समोर येणारे आकडे पाहिले तर, डोकं चक्रावून जातं.  


5 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या पुष्पा 2 नं आज चित्रपटगृहात 32 दिवस पूर्ण केले आहेत. आज फक्त दोन प्रकारचे आकडे हेडलाईनमध्ये आहेत. एक आकडा असा आहे की, या चित्रपटानं 800 कोटींची कमाई केली असून एवढी कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.


तर दुसरा आकडा असाही आला आहे की, या चित्रपटानं 1200 कोटींची कमाई केली आहे आणि यासोबतच चित्रपटानं 1200 कोटींचा नवा क्लब सुरू केला आहे. हे दोन आकडे पाहून सर्वांचाच गोंधळ उडाला आहे. पुष्पाची कमाई नेमकी कोणती? 800 कोटी की, 1200 कोटी? खरा आणि योग्य आकडा कोणता? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, दोन्ही आकडे खरेच आहेत. पुष्पाच्या कमाईचं संपूर्ण गणित समजून घेऊयात सविस्तर... 






'पुष्पा 2' चं 800 कोटींचं कलेक्शन


खरं तर, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज त्यांच्या अधिकृत इन्स्टा हँडलवरून पोस्ट केली की, चित्रपटानं 800 कोटी रुपये कमावले आहेत आणि 800 कोटी रुपयांचा हा आकडा केवळ हिंदीतील कमाईसाठी आहे. म्हणजेच, या चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनमधून इतकी कमाई झाली आहे. यामध्ये इतर भाषांच्या कमाईचा समावेश नाही.


शाहरुख खानचा जवान-पठाण किंवा सलमान खानचा सुल्तान-टायगर 3 या दोघांनीही एवढी कमाई केलेली नाही किंवा आमिर खानच्या एकाही चित्रपटानं एवढी कमाई केलेली नाही. एकूणच, पुष्पा 2 नं हिंदीत 800 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. आणि असं करणारा पुष्पा 2 हा पहिला भारतीय आणि दाक्षिणात्य चित्रपट ठरला आहे.


आता 1200 कोटींच्या आकड्याचा अर्थ काय?


Sacknilk नुसार, आज चित्रपटानं भारतात रिलीज झालेल्या सर्व भाषांमधील कमाईतून 1200 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. त्यापैकी 800 कोटी रुपये एकट्या हिंदीतून आले आहेत आणि उर्वरित 400 कोटी रुपयांची कमाई पुष्पा 2 नं तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळममधून कमावले आहेत.


म्हणजेच, पुष्पा 2 800 कोटींची कमाई करुन हिंदीमध्ये एवढी कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. त्यासोबतच 1200 कोटींची कमाई करुन भारतीय सिनेमामध्ये सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Most Profitable Films of 2024: 'या' यादीमुळे बॉलिवूड फिल्म्सची पोलखोल; फक्त 2 हिंदी चित्रपटांनीच मिळवलं स्थान