Kalawant Dhol Tasha Pathak Pune : पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाचा (Kalawant Dhol Tasha Pathak Pune) जल्लोष पाहायला मिळत आहे. तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), श्रुती मराठे (Shruti Marathe), आस्ताद काळे (Astad Kale), दिप्ती देवी (Dipti Devi), सौरभ गोखलेसह (Saurabh Gokhale) अनेक कलाकार ढोल वादनात सहभागी झाले होते.
ढोल ताशा वादनादरम्यान एबीपी माझाशी बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणाला,"गेल्या दहा वर्षांपासून कलावंत ढोल ताशा पथक सुरू आहे. आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होताना एक वेगळाच आनंद मिळतो. संगीतात एक वेगळी एनर्जी असते. प्रामाणिकपणे दीड महिना प्रॅक्टिस करून ढोल वादन करण्यात एक वेगळीच मजा आहे".
आता होऊ दे धिंगाणा म्हणत सिद्धार्थस जाधवचा जल्लोष
सिद्धार्थ जाधव पुढे म्हणाला,"शिवडीत आमचा सार्वजनिक गणेशोत्सव असायचा. लहानपणी मी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सहभागी होत असे. बाप्पाच्या आशीर्वादाने चांगल्या कलाकृती मिळत आहेत. मराठी सिनेमांना प्रेक्षक जात आहेत. ही एक आनंददायी बाब आहे. त्याचा आनंद आज सादरा करत आहे. कलावंत ढोल ताशा पथकाचं यंदाचं दहावं वर्ष आहे. त्यामुळे दुप्पट एनर्जी मिळत आहे. गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या आता होऊ दे धिंगाणा".
तेजस्विनी पंडित म्हणाली,"मला असं वाटतं की, पुण्यातील बाप्पाची मिरवणूक ही कायमच खूप गाजणारी असते. गणरायाच्या नावाने जे गजर करतात त्यांच्यासाठी अत्यंत मोलाची आणि कौतुकाची बाब असते. आमच्या कलावंत ढोल ताशा पथकाला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या 14 वर्षांपासून मी ढोल वादन करत आहे. पण कलावंत ढोल पथकात मला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत".
तेजस्विनी पंडित पुढे म्हणाली,"कलावंत ढोल ताशा पथकात सहभागी होणाऱ्या सर्वांचचं खूप कौतुक वाटतं.
शूटिंगमधून वेळ काढून कलाकार मंडळी ढोल ताशा पथकात सहभागी होत आहेत. प्रत्येकवर्षी एखादा नवीन हात बसवला जातो. सिद्धार्थ जाधव, श्रुती मराठे, अनुजा साठे, दिप्ती देवी, सौरभ गोखले, आस्ताद काळे यंदा सहभागी झाले आहेत. गणेशोत्सवापासून प्रत्येक उत्सवाची सुरुवात होते. पण बाप्पाला निरोप देताना खूप वाईट वाटतं".
मराठी कलाकारांनी केला ढोल-ताशांचा गजर
मराठी कलाकारांनी बाप्पाच्या मिरवणुकीत बेभान होऊन ढोल-ताशांचा गजर केला आहे. ढोल-ताशांचा गजर करतानाचे मराठी कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कलावंत ढोल ताथा पथक दरवर्षी बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होत असतं. पुण्यातील बेलबाग चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली असून आता ढोल ताशांच्या गजरात कलाकार बाप्पाला निरोप देणार आहेत.
संबंधित बातम्या