जोधपूर : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा आज विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थानच्या जोधपूरमधील हॉटेल उमेद भवनमध्ये हा शाही लग्नसोहळा पार पडेल.
प्रियांका आणि निक आज कॅथलिक पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकतील. तर उद्या या दोघांचा हिंदू पद्धतीने लग्न होईल. लग्नासाठी प्रियांका आज पांढऱ्या रंगाचा गाऊन तर निक फॉर्मल ड्रेस परिधान करणार आहे.
लग्नाच्या विधीनंतर काहीवेळ प्रियांका आणि निकच्या कुटुंबातील सदस्य आपले मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत गायक मानसी स्कॉटच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. तसेच लग्नासाठी 100 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या पाहुण्यांसाठी उमेद या शाही हॉटेलचे सर्व रुम्स बुक केले आहेत. तर प्रियांका आणि निकसाठी महाराजा आणि महाराणी स्विट्स बुक करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
हिंदू पद्धतीने उद्या लग्न
जोधपूरच्या उमेद भवनमध्ये आज प्रियांका-निकचा कॅथलिक पद्धतीने लग्न होणार आहे. त्यानंतर उद्या (रविवारी) हिंदू रिती रिवाजाप्रमाणे या दोघांचे लग्न होणार आहे. त्याआधी शुक्रवारी मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडला.
लग्नासाठी दिग्गजांची हजेरी
प्रियांका आणि निकच्या लग्नासाठी बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गज पाहुणे जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत. अंबानी कुटुंबीय कालच जोधपूरमध्ये पोहोचले आहेत. मुकेश अंबानीसह त्यांच्या पत्नी निता अंबानी, मुलगी ईशा आणि मुलगा आनंद अंबानी जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत. तर सलमान खानची बहिण अर्पिता, डिझायनर सब्यसाची, गायक आणि अभिनेत्री मानसी स्कॉटही जोधपूरमध्ये पोहोचले आहेत.
प्रियांका-निक आज विवाहबंधनात, कॅथलिक पद्धतीने लग्न होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Dec 2018 01:27 PM (IST)
प्रियांका आणि निक आज कॅथलिक पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकतील. तर उद्या या दोघांचा हिंदू पद्धतीने लग्न होईल. लग्नासाठी प्रियांका आज पांढऱ्या रंगाचा गाऊन तर निक फॉर्मल ड्रेस परिधान करणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -