मुंबईः बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री प्रियंका चोप्राने नवा विक्रम नावावर केला आहे. जगातील सर्वात जास्त फीस घेणाऱ्यांच्या यादीत प्रियंकाला आठवं स्थान मिळालं आहे. हा विक्रम नोंदवणारी प्रियंका पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे.



विक्रमी 73 कोटी रुपयांच्या फीससह प्रियंकाने आठवं स्थान मिळवलं आहे. जगात सर्वात जास्त फीस घेणाऱ्या हायपेड अभिनेत्रींची यादी फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रियंका आठव्या स्थानावर आहे. हॉलिवूड अभिनेत्री 288 कोटी रुपये एवढ्या फीससह पहिल्या स्थानावर आहे.



यादीतील टॉप 10 अभिनेत्री

  1. सोफिया वर्जारा 288 कोटी

  2. कॅली कुओको 164 कोटी

  3. मिंडी कॅलिंग 100 कोटी

  4. मॅरिस्का हार्टिगे 97 कोटी

  5. अॅलेन पॉम्पियो 97 कोटी

  6. कॅरी वॉशिंग्टन 90 कोटी

  7. स्टॅना कॅटिक 80 कोटी

  8. प्रियंका चोप्रा 73 कोटी

  9. जुलियाना मारगुलिस 70 कोटी

  10. ज्यूली बॉवेन 67 कोटी