हार्वी विनस्टीनच्या कृत्यावर संताप व्यक्त करताना प्रियांका म्हणाली की, “हार्वी विनस्टीनचं प्रकरण धनशक्तीच्या अध:पतनामुळे उजेडात आलं. त्याच्या सेक्सशुएलिटीमुळे नव्हे. शिवाय, असे हार्वी विनस्टीन हे केवळ हॉलिवूमध्येच नव्हे, तर ते प्रत्येक ठिकाणी आहेत.”
बॉलिवूडचा थेट उल्लेख करण्याचं टाळत प्रियांका म्हणाली की, “हार्वी विनस्टीन हा केवळ हॉलिवूडपर्यंत मर्यादित नाही. तर असे अनेकजण बॉलिवूडमध्येही आहेत. अन् अशा व्यक्तींमुळे करीअरची मोठी स्वप्न पाहणाऱ्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. एखाद्या मुलीसाठी तिच्याकडून तिचे काम काढून घेणं फार वाईट असतं.”
सध्या हॉलिवूडमध्ये हार्वी विनस्टीनच्या सेक्स स्कँडलची जोरदार चर्चा आहे. अनेक अभिनेत्री आणि महिलांनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केले आहेत.
दरम्यान, ‘कॉस्टिंग काऊच’ आणि ‘कामाच्या बदल्यात सेक्स’ यावरील ही पहिली चर्चा सिनेसृष्टीत होत नाही आहे. तर यापूर्वीही अशी अनेक प्रकरणं समोर आली होती. बॉलिवूडमध्येही अनेक सेक्स स्कँडल उजेडात आल्यावर मोठा वाद निर्माण झाला होता.
संबंधित बातम्या
अभिनेत्रींचं लैंगिक शोषण, निर्मात्याची ऑस्करमधून हकालपट्टी