पार्टीमध्ये जे फोटो व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये प्रियांका सिगारेट ओढत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रियांकासोबत तिची आईदेखील सिगारचे झुरके मारत आहे.
मागील दिवाळीमध्ये प्रियांकाने सर्व भारतीयांना फटाके न वाजवण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन करत असताना प्रियांकाने तिला अस्थमा असल्याचे कारण दिले होते. परंतु कालपर्यंत आपल्याला अस्थमा आहे, असं म्हणणारी प्रियांका आज सिगारेट ओढताना दिसली. त्यामुळे तिला नेटीझन्स ढोंगी म्हणू लागले आहेत.
कालपर्यंत लोकांना फटाके वाजवू नका, त्याने वायू प्रदूषण होतं म्हणणारी प्रियाका आज स्वतः सिगारेटचे झुरके मारताना दिसत आहे. त्यामुळे तिचा अस्थमा हा केवळ दिवाळीपुरता मर्यादित होता का? असा सवाल लोकांनी उपस्थित केला आहे.
प्रियांका चोप्रा आई होणार?
यापुढे आम्हाला अक्कल शिकवू नकोस, अशा शब्दांत अनेकांनी तिला फैलावर घेतले. तर काहींनी अस्थमा असलेली व्यक्ती सिगारेट कशी ओढू शकते? अस्थमा फक्त दिवाळीतच होतो का? तू अशी दुटप्पी आणि खोटं कशी वागू शकतेस? असे सवाल प्रियंकाला विचारले आहेत.
विशेष म्हणजे दिवाळीमध्ये जेव्हा प्रियांकाने फटाके वाजवू नका असे आवाहन करताना जो व्हिडीओ शेअर केला होता, तेव्हा काही नेटीझन्सनी तिच्या सिगारेट पिण्यावरुन तिला प्रश्न केले होते, तेव्हा नेटीझन्सना ती म्हणाली होती की, धुम्रपान करणे हे खूप वाईट असतं, अत्यंत घाणेरडं असतं.
व्हिडीओ आणि मजेशी ट्वीट्स पाहा