मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा प्रियकर हॉलिवूड गायक निक जोनास यांची एन्गेजमेंट पार्टी मुंबईत होत आहे. प्रियांकाचं मुंबईतील घरही या सोहळ्यासाठी सजवण्यात आलं आहे. प्रियांका आणि निक दोघंही भारतात दाखल झाल्यानंतर काल रात्री 10 वाजता चोप्रा आणि जोनास कुटुंबियांनी जुहूमधील जेडब्लू मॅरिएटमध्ये एकत्र जेवण केलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांका आणि निक पंजाबी रीतीरिवाजाप्रमाणे साखरपुडा करणार आहेत. प्रियांकाच्या घरी पाहुण्यांची रेलचेलही सुरु झाली आहे.
प्रियांका आणि निकचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोच्या मागे एन पी (NP)असं लिहिण्यात आलं आहे. या फोटोत दोघेही पारंपरिक वेशात दिसत आहेत. प्रियांका पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे, तर निकने सफेद कुर्ता घातलेला दिसत आहे.