मुंबई: महान कवि साहिर लुधियानवी यांच्यावर आधारित सिनेमात अभिनेत्री प्रियंका चोप्रा काम करणार असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार समजतं आहे.  दिग्दर्शक संजय लीला भन्साली हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, आपण आतापर्यंत अशाप्रकारचा कोणताही सिनेमा साइन केलेला नाही.


दरम्यान, प्रियंका याविषयी बोलताना म्हणाली की, जर भन्साली यांनी तिला या सिनेमात काम करायला सांगितलं तर आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही.

प्रियंका म्हणाली की, 'मी अद्याप कोणत्या सिनेमाबाबत निर्णय घेतलेला नाही. पण संजय सर ही अशी व्यक्ती आहे की, ज्यांना मी नाही म्हणू शकत नाही. त्यांना माहिती आहे की, मला कशाप्रकारची कामं करणं आवडतं.'

'जेव्हा पण आम्ही भेटतो तेव्हा-तेव्हा आम्ही एकत्र काम करण्याबाबत नक्कीच चर्चा करतो. मला आशा आहे की, आम्ही पुढेही एकत्र काम करु. पण अद्याप मी अशाप्रकारचा कोणताही सिनेमा साइन केलेला नाही.' असं प्रियंकानं स्पष्ट केलं.