मुंबई : प्रकाश जाजूने केलेल्या आत्महत्येच्या दाव्यावर अभिनेत्री प्रियांका चोप्राने अखेर मौन सोडलं आहे. प्रकाश जाजूचं विधान चुकीचं आहे. कोणासाठी जीव देण्याआधी मी समोरच्याचा जीव घेईन, असं प्रियांका चोप्रा म्हणाली.
प्रकाश जाजू हा प्रियांका चोप्राची माजी मॅनेजर होता. टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्याचे दोन-तीन दिवसांनी प्रकाश जाजूने दावा केला होता की, स्ट्रगलिंगच्या दिवसात प्रियांकाने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
सुर्वात आधी प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी खोटे असल्याचे सांगितले होते. आता प्रियांकाने प्रकाश जाजूचे दावे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.
प्रकाश जाजूचा दावा खोटा : प्रियांका
प्रियांका म्हणाली की, ' प्रकाश जाजूचा दावा खोटा आहे. ज्या व्यक्तीने मला त्रास दिला, माझा छळ केला त्याला मीडिया महत्त्व देत आहेत. याचं मला अतिशय दु:ख आहे. त्याचा भूतकाळ माहित न करता त्याच्यावर विश्वास ठेवला.
ज्या घरात सुनांना मारहाण केली जाते, छळ होतो, त्यांच्याबाबत मीडिया का बोलत नाही?, असा सवालही प्रियांकाने मीडियाला विचारला
प्रियांका चोप्रा म्हणाली की, तरुण-तरुणी कॉलेज आणि होस्टेलमध्ये आत्महत्या करत आहेत. पण ते दुसऱ्यांसाठी स्वत:चा जीव का देतात. कोणासाठी जीव देण्याआधी मी समोरच्याचा जीव घेईन.