Anant Radhika Engagement : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग प्रोग्रॅम्सला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (17 जानेवारी) मेहंदी सोहळा पार पडला. तर गुरुवारी (19 जानेवारी) राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखपुड्याला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या कुटुंबासह पोहोचला होता. शाहरुख खानची पत्नी गौरी आणि मुलगा आर्यन यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखपुड्याला हजेरी लावली. 



रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी देखील अनंत आणि राधिका यांच्या साखपुड्याला उपस्थिती लावली. दीपिका लाल रंगाच्या साडीत तर रणबीर काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला.



अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांनी अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याला खास लूक केला होता. 




 अनंत  आणि राधिका यांच्या साखपुड्यासाठी सारानं ऑल व्हाईट लूक केला होता. तिच्या या लूकने अनेकांचे लक्ष वेधले. 




तसेच करण जोहर, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय यांनी देखील अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली. 



अँटिलियामध्ये अनंत आणि राधिकाचा साखरपुडा


मुंबईतील अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे पार पडला. गोल धना आणि चुनरी विधी (Gol dhana and Chunari Vidhi) या परंपरेप्रमाणे दोघांचा साखरपुडा झाला. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब हजर होतं.  


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा रोका 29 डिसेंबर 2022 रोजी राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरामध्ये झाला होता. यानंतर अंबानी कुटुंबाने मुंबईत एंगेजमेंट पार्टीही आयोजित केली होती. लवकरच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे लग्नबंधनात अडकणार आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Radhika Merchant Mehndi: राधिका मर्चंटच्या हातावर रंगली अनंत अंबानीच्या नावाची मेहंदी; 'घर मोरे परदेसिया' वरील डान्सचा Video Viral