मुंबई : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा आणि अमेरिक गायक अभिनेता निक जोनस यांच्या लग्नाची तारीख ठरल्याचं म्हटलं जात आहे. निकच्या वाढदिवशीच दोघं साताजन्माची गाठ बांधणार असल्याची माहिती आहे.
16 सप्टेंबर रोजी निक 26 वर्षांचा होत आहे. याच मुहूर्तावर प्रियंका आणि निक लग्न करणार असल्याची चर्चा आहे. अवघा दीड महिना उरल्यामुळे प्रियंकाच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.
प्रियंका चोप्रा-निक जोनस यांचा जुलैमध्ये साखरपुडा?
लग्नासाठीच प्रियंका चोप्राने अभिनेता सलमान खानच्या आगामी 'भारत' चित्रपट सोडल्याचं म्हटलं जातं. 'भारत' चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने ट्विटरवरुन त्याविषयीचे संकेत दिले होते.
'प्रियंका भारत चित्रपटाचा भाग नसेल. त्याचं कारण खूप खास आहे. तिने शेवटच्या क्षणी आपला निर्णय कळवला. आम्ही तिच्यासाठी खूप आनंदी आहोत. भारत चित्रपटाच्या टीमकडून प्रियंकाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा' असं अलीने लिहिलं होतं.
निकसोबत लग्नासाठी प्रियांका चोप्राने 'भारत' सोडला?
25 वर्षांचा निक जोनस अमेरिकन गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. प्रियंका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे.
प्रियंकाने भूमिका केलेल्या 'काँटिको' मालिकेतील तिचा सहकलाकार ग्रॅहम रॉजर्सने दोघांची ओळख करुन दिली होती. आपल्या कुटुंबीयांना भेटवण्यासाठीच प्रियंका निकला सोबत घेऊन जून महिन्यात भारतात आली होती.
संबंधित बातम्या
वर्षभरापूर्वी कमिटेड होते, आता सिंगल : प्रियंका चोप्रा
प्रियांका चोप्राने उरकलं गुपचूप लग्न?