मुंबई : हॉलिवूडमध्ये छाप पाडणारी बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनस यांच्यातील प्रेमसंबंधांच्या चर्चा जगभरात सुरु आहेत. भारत दौऱ्यावर आलेलं हे जोडपं पुढच्या महिन्यात एंगेजमेंट करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

'फिल्मफेअर' मासिकाच्या रिपोर्टनुसार जुलैअखेर किंवा ऑगस्ट महिन्यात प्रियंका आणि निक साखरपुडा करण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबीयांना भेटवण्यासाठीच प्रियंका निकला सोबत घेऊन भारतात आल्याचा अंदाज आहे. प्रियंका आणि निक सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहेत.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच प्रियंकाने निकच्या नातेवाईकांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी जोनस कुटुंबासोबत तिची गाठभेट झाली. त्यानंतर प्रियंका आणि निक 21 जूनला मुंबईत आले.

25 वर्षांचा निक जोनस अमेरिकन गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. वयाच्या सातव्या वर्षी त्याने नाटकात काम करायला सुरुवात केली. प्रियंका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे.

प्रियांका चोप्राने उरकलं गुपचूप लग्न? 

प्रियंकाने भूमिका केलेल्या 'काँटिको' मालिकेतील तिचा सहकलाकार ग्रॅहम रॉजर्सने दोघांची ओळख करुन दिली होती. खुद्द निकनेच ही माहिती एका मुलाखतीत दिली होती. 'न्यू यॉर्कमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. 'मेट गाला विथ राल्फ लॉरेन' कार्यक्रमाला योगायोगाने आम्ही जाणार होतो. तेव्हा आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला. ती खूप प्रेमळ आहे. भारतात जाण्यासाठी मला धीर धरवत नाही' असं निक न्यूयॉर्कमध्ये म्हणाला होता.

संबंधित बातम्या 

वर्षभरापूर्वी कमिटेड होते, आता सिंगल : प्रियंका चोप्रा