मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान फिल्म इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहूनही अधिक काळ सक्रिय आहे. आजही त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. सलमान खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते फारच आतुर असतात. शिवाय, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्याचीही चाहत्यांची कायम इच्छा असते. अभिनेता सलमान खानच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा त्याची पर्सनल लाईफ कायम चर्चेत राहिली आहे. त्याबद्दल अनेक किस्से समोर आले आहेत. सलमान खानने 'बीवी हो तो ऐसी से' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली पण, त्याला खरी ओळख 'मैने प्यार किया' चित्रपटामधून मिळाली. या चित्रपटाने लाखो लोकांना सलमानचं वेड लावलं. तेव्हापासून आजतागायत तो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. 


90 च्या दशकातील या सुंदरीसोबत लग्न करण्याची सलमानची इच्छा


सलमान खान त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत राहिला आहे. सलमानच्या आयुष्यात अनेक वेळा प्रेमाची एन्ट्री झाली. पण त्याचं कोणतही रिलेशन लग्नापर्यंत पोहोचलं नाही. मात्र, एकदा स्वतः सलमान खानने इंडस्ट्रीतील कोणत्या अभिनेत्रीशी लग्न करायचं आहे, याचा खुलासा केला होता. हे ऐकताच तुम्हाला संगीता बिजलानी किंवा ऐश्वर्या राय यांचं नाव तुमच्या मनात आलं असेल. पण, या अभिनेत्री नाही तर 90 च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्रीशी लग्न करण्याची सलमान खानची इच्छा होती.


भाईजानसाठी 'ही' अभिनेत्री लग्नासाठी परफेक्ट 


सलमान खान एकदा करण जोहरच्या शोमध्ये पोहोचला होता. करण जोहरने सलमान खानला विचारलं, तुला कोणत्या अभिनेत्रीशी लग्न करायचं आहे? यावर उत्तर देताना भाईजानने 90 च्या दशकातील एका सौंदर्यवतीचं नाव घेतलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे डिंपल गर्ल प्रीती झिंटा आहे. अभिनेत्री प्रीती झिंटासोबत सलमान खानने अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि दोघांची जोडी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. 




सलमान खानने स्वत: केला होता खुलासा


मुलाखतीत बोलताना सलमान म्हणाला होता की, त्याला प्रीती झिंटा लग्नासाठी परफेक्ट वाटते. प्रीती झिंटाबाबतच सलमान खानचं हे वक्तव्य बरंच दिवस चर्चेत होतं. सलमान खान आणि प्रीती झिंटा याची खूप चांगले मैत्री आहे. या दोघांमध्ये कधीच प्रेमसंबंध नव्हते, त्यामुळे हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलं नाही. 2016 मध्ये प्रीतीने जीन गुडइनफशी (Gene Goodenough) लग्न केलं. जीन प्रीतीपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. सलमान खान कतरिना कैफसोबत 'टायगर 3' चित्रपटात दिसला होता, आता तो लवकरच 'सिकंदर' चित्रपटामधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Salman Khan : जेव्हा सलमान खानने वाचवले चिमुरडीचे प्राण, भाईजाननं केलं बोन मॅरो दान, जाणून घ्या संपूर्ण कहाणी