Pravin Tarde : कलाकार सोशल मीडियावर त्यांची राजकीय मतं मांडत असतात. यामुळे ते अनेकदा ट्रोलदेखील होत असतात. यासगळ्यावर 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी (Pravin Tarde) अखेर भाष्य केलं आहे. चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कोणत्याच कलाकाराने राजकीय भूमिका घेऊन नयेत, असे प्रवीण तरडे म्हणाले. 


प्रवीण तरडेंनी अप्रत्यक्षपणे टोचले केतकी चितळेचे कान 


प्रवीण तरडे म्हणाले,"सिनेसृष्टीतील कोणत्याच कलाकाराने राजकीय भूमिका घेऊ नयेत. शंभर टक्के मी याच मताचा आहे. असं म्हणत प्रवीण तरडेंनी अप्रत्यक्षपणे केतकी चितळेचे कान टोचले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमाला चांगले यश मिळत आहे. यात प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे". 


प्रेक्षकांचे आभार मानत प्रवीण तरडे पुढे म्हणाले,"कलाकारांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना काळजी घ्यावी. केतकीचे प्रकरण मला माहित नाही. त्यावेळी मी सिनेमाच्या कामात व्यस्त होतो. पण कोणत्याच कलाकाराने एकाच राजकीय व्यक्ती संबंधित भूमिका घेऊ नये". 


प्रविण तरडेंचा  'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.'परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट' असे दमदार डायलॉग या सिनेमात आहेत. अनेक कलाकारदेखील हा सिनेमा आवर्जून बघत असून, त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड


'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमात गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर प्रविण तरडे स्वतः ‘सरसेनापती हंबीररावां’ची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. आता सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे.


संबंधित बातम्या


Kushal Badrike : 'हंबीरराव' एक दैदीप्यमान सिनेमा; कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत


Pravin Tarde : फक्त 50 दिवस राहिले म्हणत प्रविण तरडेंनी शेअर केले 'सरसेनापती हंबीरराव'चे पोस्टर