मुंबई : प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतने नवा दावा केला आहे. प्रत्युषाने काही महिन्यांपूर्वी एक कोटी रुपयांचा विमा काढला होता. या पॉलिसीमध्ये प्रत्युषाचा बॉयफ्रेण्ड राहुल राजने तिच्याकडून जबरदस्तीने लिहून घेतलं होतं की, प्रत्युषानंतर हा पैसा राहुलला मिळेल.

'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या


त्यावेळी मी तिला असं न करण्याचा सल्ला दिला होता. शिवाय राहुलऐवजी आई-वडिलांना इन्शुरन्स पॉलिसीचा नॉमिनी बनवावं, असंही प्रत्युषाला सांगितल्याचा दावा राखी सावंतने केला आहे.

प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज पोलिसांच्या ताब्यात



पण तरीही तिने राहुलला नॉमिनी केलं आणि आता प्रत्युषाच्या आत्महत्येची बातमी येणं योगायोग नाही, असं राखी म्हणाली. या पैशांसाठीच प्रत्युषाची हत्या झाली का, याचीही चौकशी करावी. शिवाय या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवाव, अशी मागणी राखीने केली आहे

'प्रत्युषा आत्महत्या करुच शकत नाही, हा खून आहे'



राखीच्या या दाव्यानंतर प्रत्युषाचा बॉयफ्रेण्ड राहुल राय याच्यावरील संशय अधिकच वाढला आहे.

प्रत्युषा बॅनर्जी आणि बॉयफ्रेंड राहुलची 'ती' मुलाखत!



प्रत्युषाने शुक्रवारी संध्याकाळी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी आज तिचा बॉयफ्रेण्ड राहुल राज याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

 

प्रत्युषाच्या काही खास मित्रांनी सांगितलं की, ‘प्रत्युषा मागील काही दिवसांपासून खूपच निराश होती. काम न मिळणं, पैशाची चणचण आणि वारंवार बॉयफ्रेंडसोबत होणारे वाद यामुळे ती फारच त्रासून गेली होती.’

 

काय म्हणाली राखी सावंत?