Prashant Damle: अभिनेते  प्रशांत दामले (Prashant Damle)  हे  मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक यांच्या  माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. प्रशांत दामले यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या  आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. प्रशांत दामले यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.   प्रशांत दामले यांनी विजयादशमीनिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली. नेटकऱ्याच्या कमेंटला प्रशांत दामले यांनी दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


प्रशांत दामले यांनी विजयादशमीनिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "दामले दादा, चांगले कार्य करताना काळे कपडे नसतात परिधान करायचे." नेटकऱ्याच्या या कमेंटला प्रशांत दमाले यांनी रिप्लाय दिला, 'उघडा कसा येणार?' प्रशांत दमाले यांच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी प्रशांत दामले यांच्या या रिप्लायचं कौतुक केलं आहे. 



प्रशांत दामले हे सध्या त्यांच्या सारखं काहीतरी होतंय,  एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. प्रशांत दामले यांच्या नियम व अटी लागू या नाटकानं देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या नाटकाचे लेखन संकर्षण कऱ्हाडेनं केलं आहे तर दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं आहे. या नाटकात अमृता देशमुख, प्रसाद बर्वे आणि संकर्षण कऱ्हाडे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारतात. देशातच नाही तर परदेशातही या नाटकाचे प्रयोग झाले आहे. या नाटकाची निर्मिते प्रशांत  दामले आहेत. 






प्रशांत दामले यांनी 1983 साली 'टूरटूर' या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांनी वेगवेगळ्या नाटकांत वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आणि त्यांच्या रंगभूमीवरील प्रवासाची बस सुसाट सुटली. प्रशांत दामले यांच्या नकळत दिसले सारे, कार्टी काळजात घुसली, संगीत संशयकल्लोळ, साखर खाल्लेला माणूस आणि एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. प्रशांत दामले यांनी  मुंबई पुणे मुंबई या चित्रपटात देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Prashant Damle: 'ही गर्दी नाही, ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची'; प्रशांत दामले यांची खास पोस्ट