प्रिया वारियरचा बॉलिवूड डेब्यू, रणवीरसोबत सिनेमा
एबीपी माझा वेब टीम | 12 Mar 2018 11:41 AM (IST)
करण जोहरची सहनिर्मिती असलेल्या रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा' चित्रपटात प्रिया वारियर रणवीर सिंगसोबत झळकणार आहे.
मुंबई : नशिब कधी कोणाला यशोशिखरावर नेईल, हे सांगता येत नाही. रातोरात नॅशनल क्रश झालेली इंटरनेट सेन्सेशन प्रिया वारियर हिच्या बाबतीत असंच काहीसं झालं आहे. प्रिया लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून रणवीरसोबत रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' चित्रपटात ती भूमिका साकारणार आहे. प्रिया वारियरची भुरळ देशभरातील तरुणांना पडली आहे. बॉलिवूडमधल्या परीकथांचा कर्ता-करविता करण जोहरलाही प्रियाने मोहिनी घातली. करण जोहरची सहनिर्मिती असलेल्या रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा' चित्रपटात प्रिया वारियर रणवीर सिंगसोबत झळकणार आहे. प्रियाने रणवीरसोबत चित्रपट करणं हे आपलं स्वप्न असल्याचं सांगितलं होतं. तिच्या तोंडातून इच्छा व्यक्त होण्याचा अवकाश, ती पूर्ण झाली. सिम्बामध्ये प्रियाच्या वाट्याला आलेली भूमिका मात्र फार मोठी नाही, मात्र पहिलाच सिनेमा तिच्यासाठी लॉटरी ठरु शकतो. 18 वर्षांची प्रिया 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करणार आहे. या चित्रपटातील प्रिया झळकलेल्या 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. भुवया उडवणारा प्रियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. संबंधित बातम्या :