Prakash Raj: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) हे वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडत असतात. ते ट्विटरवर अनेक विषयांवरील ट्विट्स शेअर करतात. नुकतेच प्रकाश राज यांनी एक ट्वीट शेअर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींच्या 20 वेगवेगळ्या लूकमधील फोटोंचा कोलाज प्रकाश राज यांनी या ट्वीटमध्ये शेअर केला. नरेंद्र मोदींचा फोटो शेअर करुन त्यांनी लिहिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
प्रकाश राज यांचे ट्वीट
प्रकाश राज यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोचा कोलाज शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ओव्हर ड्रेसिंग... ही नवी नग्नता आहे.' प्रकाश राज यांच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. .या ट्वीटला जवळपास 2,331 नेटकऱ्यांनी रिट्वीट केलं आहे. तर प्रकाश यांच्या या ट्वीटला 18.9 हजार लोकांनी लाइक केले आहे.
प्रकाश राज यांनी याआधी देखील नरेंद्र मोदी यांच्याबाबत ट्वीट शेअर केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार या विषयावर बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन प्रकाश राज यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आपल्या इथे आता सगळीकडे भ्रष्टाचार सुरु आहे. जसे की, 40 टक्के, 30 टक्के, 20 टक्के'
सिंघम, वॉन्टेड या हिंदी चित्रपटांमधून तर मेजर आणि पुष्पा या दाक्षिणात्य चित्रपटांमधून प्रकाश राज हे प्रेक्षकांच्या भेटीस आले. प्रकाश हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. पण सध्या प्रकाश राज हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चात आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: