Prajaktta Mali: मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे.  प्राजक्तानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं. मध्यमवर्गीय घरातील मुलगी ते अभिनेत्री हा प्राजक्ताचा प्रवास खडतर होता. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्राजक्तानं तिच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. 


प्राजक्तानं सांगितली स्ट्रगल स्टोरी


झी-मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्तानं तिच्या स्ट्रगलबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'मी पुण्याची असल्याने मला मुंबई शिफ्ट व्हावं लागलं. तेव्हा मुंबईत माझे नातेवाईक नव्हते. मुंबई नवी होती, कुटुंबाला सोडून राहणं देखील नवं होतं. माझे कुटुंब लोअर मिडल क्लास होते. माझे वडील पोलीस खात्यात होते, त्यामुळे जेवढे पैसे आहे त्यातच सर्व अॅडजेस्ट करायचं, असं वातावरण घरात होतं. त्यावेळी लोकल ट्रेन तसेच मुंबई- पुण्याच्या मालगाडीतूनही मी प्रवास केला आहे.' 


पुढे प्राजक्तानं सांगितलं, 'मुंबईतील चित्रपटांच्या सेटवर वेगळं वातावरण होतं. चढाओढ, राजकारण, गॉसिप्स हा सर्व गोष्टी तिथे केल्या जात होत्या. या सर्वच बाबतीत संघर्ष होता. स्ट्रगल हा आजही सुरु आहे. फक्त स्ट्रगलचा झोन बदलला आहे. मिळालेलं यश टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.  मला वाटतं स्ट्रगल कायम असणार आहे.'






प्राजक्तानं चित्रपटामध्ये आणि मालिकेमध्ये केलं काम


प्राजक्ता सध्या तिच्या रानबाझार या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये प्राजक्तानं रत्ना ही भूमिका साकारली आहे. रानबाझार सीरिजमधील प्राजक्ताच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. तसेच लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. प्राजक्ताबरोबरच या चित्रपटामध्ये अभिनेता अंकुश चौधरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती.  जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली. प्राजक्ता ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिला एक मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. प्राजक्ता ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Prajaktta Mali: चाहत्याचा प्राजक्ताला सवाल 'लग्न करु की नको?', अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, 'माझा भरवसा नाही'