मुंबई : 'बाहुबली'ने प्रभासला केवळ देशभरातच नाही तर परदेशात लोकप्रियता मिळवून दिली. बाहुबलीमुळे प्रभासला लग्नाचे प्रस्तावच नाही तर अनेक जाहिरातींच्या ऑफर आल्या पण त्याने त्या नाकारल्या. यामध्ये दहा कोटींच्या जाहिरातीचाही समावेश आहे.
बाहुबलीनंतर प्रभासला तब्बल 6000 लग्नाचे प्रस्ताव आले होते, जे त्याने नाकारले. इतकंच नाही तर बाहुबली द बिगीनिंगच्या यशानंतर त्याला अनेक जाहिरातींची ऑफर आल्या होत्या, पण त्याने त्या नाकारल्या.
यामध्ये एका जाहिरातीसाठी त्याला 10 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. पण त्याने ती नाकारली, कारण त्याला फक्त आणि फक्त 'बाहुबली 2' वर लक्ष केंद्रीत करायचं होतं. विशेष म्हणजे 'बाहुबली 2' साठी त्याला 25 कोटी रुपये मिळाल्याचं वृत्त आहे.
याशिवाय एस.एस. राजामौली यांना दिलेल्या कमिटमेंटमुळे प्रभासने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांना नकार दिला होता.
प्रभासला फक्त चाहत्यांचं प्रेम मिळालं नाही तर दिग्दर्शक एस एस राजामौली यांचा तो लाडकाही बनला. त्यामुळेच त्याच्याबद्दल बोलताना राजामौली फारच भावुक होतात.