Prabhas Shared Project K Poster : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या त्याच्या 'सालार' या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान त्याच्या आगामी 'प्रोजेक्ट के' (Project K) या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या पोस्टरने प्रभासच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता ते सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
'प्रोजेक्ट के'च्या नव्या पोस्टरवरुन हा सिनेमा सायन्स फिक्शन असल्याचा अंदाज बांधला जात आहे. अभिनेत्याने पोस्टर शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. त्याने लिहिलं आहे,"प्रोजेक्ट की झलक पाहण्यासाठी स्वत:ला तयार करा. 20 जुलैला अमेरिका आणि 21 जुलैला भारतीय प्रेक्षकांना 'प्रोजेक्ट के'ची झलक पाहायला मिळणार आहे".
प्रभासच्या या पोस्टरवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्रभासचा 'प्रोजेक्ट के' इतिहास रचणार, आता सुपरहिरोच्या सिनेमाची प्रतीक्षा आहे, प्रभासचा लूक खूपच खास असेल, अॅक्शनचा तडका पाहण्यासाठी उत्सुक आहोत, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
प्रभासच्या 'प्रोजेक्ट के'मध्ये कमल हासनची एन्ट्री! (Project K Kamal Haasan Entry)
'प्रोजेक्ट के' (Project K) या सिनेमात कमल हासन (Kamal Haasan) खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमासाठी त्यांनी तब्बल 150 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. तसेच या सिनेमाच्या शूटिंगसाठी त्यांनी 20 दिवस दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे 20 दिवसांत कमल हासन यांनी 150 कोटींची कमाई केली आहे. 'बिग बॉस तामिळ 7'च्या शूटिंगआधी कमल हासन यांनी 'प्रोजेक्ट के'चं शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
'प्रोजेक्ट के' कधी होणार रिलीज? (Project K Release Date)
प्रभासचा बहुचर्चित 'प्रोजेक्ट के' हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी मकरसंक्रातीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाग अश्विनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रभास, दीपिका आणि कमल अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
'इंडियन 2' या सिनेमाचं प्रभास सध्या शूटिंग करत आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांना 'प्रोजेक्ट के' या सिनेमासाठी विचारणा झाली. या सिनेमात ते बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दीपिका पादुकोणसोबत (Deepika Padukone) झळकणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले होते. त्यानंतर काही दिवस त्यांनी शूटिंगमधून ब्रेक घेतला होता.
संबंधित बातम्या