Prabhas: आपल्या आवडत्या कलाकारासोबत सेल्फी काढायाची इच्छा अनेकांना असते. अनेकवेळा चाहते अतिशय नम्रपणे कलाकाराला फोटो काढण्यासाठी रिक्वेस्ट करतात. तसेच फोटो काढल्यानंतर चाहते कलाकारांना 'थँक्यु' देखील म्हणतात. पण सध्या अभिनेता प्रभासच्या (Prabhas) चाहतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रभासची चाहती फोटो काढल्यानंतर चक्क प्रभासच्या गालावर चापट मारते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी प्रभासच्या जवळ फोटो काढण्यासाठी जाते. फोटो काढल्यानंतर त्या मुलीला खूप आनंद होतो. त्यानंतर ती प्रभासच्या गालावर चापट मारते. चाहतीनं गालावर चापट मारल्यानंतर प्रभास त्याच्या गालावर हात ठेवतो आणि तिच्याकडे पाहून स्माईल करतो. प्रभासनं दिलेल्या या रिअॅक्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
प्रभासच्या या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'चाहतीचा अतिउत्साह. प्रभासने फक्त हसून तिच्याकडे दुर्लक्ष केले.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'असं कोण करतं?'
पाहा व्हिडीओ:
प्रभासचे आगामी चित्रपट
प्रभासला बाहुबली या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. आता प्रभासचे काही आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्याच्या सालार या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'सालार' (Salaar) हा सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जात आहे. 'सालार' हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तसेच त्याचा 'प्रोजेक्ट के' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
प्रभासचा 'आदिपुरुष' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटामधील डायलॉग्स आणि कलाकारांच्या लूकमुळे वाद निर्माण झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. सैफ अली खान,कृती सेनन यांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. आता प्रभासच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Prabhas Bald Look : आदिपुरुष' फ्लॉप झाल्याने प्रभासला पडलं टक्कल? फोटो पाहून चाहते हैराण