Kiran Mane : अभिनेते किरण माने (Kiran Mane) नेहमीच विविध विषयांवर भाष्य करत असतात. मनोरंजनसृष्टीसह समाजकारण, राजकारण यागोष्टींवरही ते त्यांची मते मांडत असतात. आज गांधी जयंतीनिमित्त (Gandhi Jayanti 2023) अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली आहे. "सलाम महात्म्या सलाम..कडकडीत सलाम", असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.


किरण मानेंची पोस्ट काय? (Kiran Mane Post)


गांधी जयंतीनिमित्त (Mahatma Gandhi) किरण माने (Kiran Mane Post On gandhi Jayanati 2023) यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"माणूस दिसायला हडकुळा होता. किरकोळ शरीरयष्टी..छातीचा पिंजरा दिसत होता. पण माझ्या भावा, त्या छातीत असा दम होता की आजपण अख्खं जग त्याला झुकून सलाम करतं..ही होती फक्त विचारांची ताकद. अमेरिका,इंग्लंड, जर्मनी, कोरीया..पृथ्वीवरील कोणत्याही देशात जा..आज गांधीबाबाच्या विचारांनी प्रभावित झालेली, त्यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक झालेली माणसं भेटतील".


..पण त्याच्या विचारात निर्मळपणा होता : किरण माने 


किरण माने यांनी पुढे लिहिलं आहे,"आपण किती ओरडून बोललो..तरी आपल्या बोलण्यात 'सत्याचा अंश' नसेल तर जगाच्या बाजारात त्या बोलण्याला घंटा किंमत मिळत नसती. त्या महात्म्याचा आवाज खणखणीत नव्हता..चालण्यात रुबाब नव्हता. वाकून काठी टेकत-टेकत हजारो लोकांसमोर तो यायचा..पालथी मांडी घालून बसायचा अन् बसक्या आवाजात बोलायचा..पण त्याच्या विचारात निर्मळपणा होता. शब्दाशब्दात भारतमातेवरची माया नव्हती. रक्ताच्या थेंबाथेंबात आपल्या मातीतल्या गोरगरीबांसाठीची आस होती. मानवतेची कास होती..सत्याची ताकद होती". 






किरण माने म्हणतात,"गोळ्या घालून मारला बाबाला...पण तरी जिवंत राहायला..शत्रूच्या नाकावर टिच्चून. जगातला एकबी देश असा नाही जिथे त्याचा विचार पोहोचला नाही. खायचं काम नाही गड्यांनो..हजार पिढ्या खपल्यात तो विचार संपवायला पण 'गांधी' उसळी मारुन वर येतच राहणार..सलाम महात्म्या सलाम...कडकडीत सलाम". 


किरण मानेंच्या पोस्टवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव


किरण माने यांची गांधी जयंतीनिमित्तची खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. जगाला अंहिसेचे संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा गांधी यांचा विनम्र अभिवादन, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.


संबंधित बातम्या


Kiran Mane: "अजून विश्वास बसत नाय भावांनो. तब्बल शंभर दिवस..."; किरण मानेंची खास पोस्ट