मुंबई : बाहुबली चित्रपटातून अनेक चाहत्यांच्या काळजाचा ठाम घेणारा अभिनेता प्रभास आता आपला आगामी चित्रपट 'राधे श्याम'मुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. आज व्हॅलेंटाइन दिवसाच्या निमित्ताने चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. या टीझरमध्ये प्रभास डॅशिंग लूकमध्ये दिसून येत आहे. या चित्रपटात प्रभास एक लव्हर बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे.


चित्रपट 'राधे श्याम' टीझर रिलीज


'राधे श्याम'च्या रिलीज करण्यात आलेल्या टीझरमध्ये प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे दिसत आहे. टीझरमध्ये दोघेही 'राधे श्याम' चित्रपटातील एक डायलॉग बोलताना दिसत आहेत. यामध्ये पूजा प्रभासला म्हणते की, 'स्वतःला रोमियो समजतोस का?', तिला उत्तर देताना प्रभास म्हणतो की, 'नाही, त्याने प्रेमासाठी जीव दिला होता, मी त्या टाइपचा नाही.'


पाहा टीझर :


टीझरला आतापर्यंत लाखो लाईक्स


दरम्यान, चित्रपचाचा टीझर सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. आतापर्यंत टीझर लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच टीझरवर लाखो लोकांनी लाईक्सचा वर्षावही केला आहे. त्याचसोबत चित्रपटाच्या रिलीज तारखेचाही खुलासा करण्यात आला आहे. प्रभास आणि पूजा यांचा चित्रपच याच वर्षी 30 जुलै रोजी रिलीज होणार आहे. 'राधे श्याम' एक रोमॅन्टिक-ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच इंग्रजी भाषेतही रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिोनेत्री भाग्यश्री देखील एक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या टीझरसोबतच अनेक पोस्टरही रिलीज करण्यात आले आहेत.


आदिपुरुषमध्ये दिसणार प्रभास


'राधे श्याम' व्यतिरिक्त आदिपुरुषमध्येही प्रभास दिसणार आहे. यामध्ये भगवान श्रीराम यांची भूमिका प्रभास साकारणार आहे. अजय देवगण यामध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत दिसून येणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :