मुंबई : मागील शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘पोस्टर बॉईज’ पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ठिकठाक कमाई केली आहे. या सिनेमाने दोन दिवसात एकूण 4.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.


मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्शने ट्वीटच्या माध्यमातून या सिनेमाच्या दोन दिवसांच्या कमाईबाबत माहिती दिली. चित्रपटाने पहिल्या दिवशी (शुक्रवार) 1.75 कोटी तर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) 2.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी सिनेमाच्या कमाईत 37.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/906762443413536769

‘पोस्टर बॉईज’ मध्ये अभिनेता सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहेत. श्रेयस तळपदेनेच हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या सिनेमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे.

नसबंदीच्या मुद्द्यावर आधारित 2014 मध्ये आलेला मराठी चित्रपट 'पोश्टर बॉईज'चा हा ऑफिशियल रिमेक आहे. या चित्रपटात सुमारे चार वर्षांनंतर दोन्ही देओल भाऊ एकत्र दिसले आहेत. या सिनेमाचं बजेट अवघं 15 कोटी रुपये आहे.

समीक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक करुन पाहण्यासारखा असल्याचं म्हटलं आहे. सिनेमाचे संवाद परितोष पेंटरने लिहिले असून बंटी राठोडने पटकथा लिहिली आहे.

संबंधित बातम्या

कमाल खान औकातीत राहा, ‘त्या’ ट्वीटनंतर श्रेयस तळपदेची सटकली!