Post Office Ughad Aahe : छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका सुरू आहेत. मालिकांसह वैविध्यपूर्ण कार्यक्रमदेखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. आता लवकरच 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावरदेखील ही मालिका चर्चेत आहे. प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने प्रेक्षक आता मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेचा विषय थोडा वेगळा असल्याने या मालिकेच्या विषयाला धरून प्रेक्षकांची उत्सुकता वाढते आहे. पोस्ट ऑफिसचा काळ अनुभवलेल्यांसाठी या मालिकेची झलक स्मरणरंजनवत ठरली आहे. तर दुसरीकडे ज्यांनी तो काळ अनुभवला नाही त्यांच्यासाठी ही मालिका चर्चेचा विषय ठरत आहे.
नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडून 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेच्या माध्यमातून एक हलकाफुलका विषय पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हास्याची मनी ऑर्डर नक्कीच आवडेल. या मालिकेत नक्की कोणते कलाकार असतील हे अद्याप समोर आलेले नाही.
"अवघ्या महाराष्ट्राला पाठवत आहोत हास्याची मनी ऑर्डर... नवी मालिका - पोस्ट ऑफिस उघडं आहे...लवकरच...सोनी मराठी वाहिनीवर...", असं म्हणत या मालिकेची पहिली झलक चॅनलने शेअर केली आहे. उत्सुकता, वेगळ्या विषय असल्याची मालिकेची प्रतीक्षा अशा कमेंट्स मालिकाप्रेमींनी केल्या आहेत.
संबंधित बातम्या