TMKOC Popatlal Shyam Pathak Net Worth : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'  (Taarak Mehta ka ooltah chashmah) ही छोट्या पडद्यावरील मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका अव्वल ठरत असते. मालिकेसह मालिकेतील कलाकारदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या मालिकेतील एक कलाकार म्हणजेच पत्रकार पोपटलाल (Popatlal). मालिकेतील कंजूस पोपटलाल खऱ्या आयुष्यात मात्र खूपच श्रीमंत आहे. 

पोपटलाल ही भूमिका मालिकाप्रेमींच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत पोपटलाल खूप कंजूस असलेला पाहायला मिळतो. त्याचं हे कंजूस असणं त्याच्या चाहत्यांना आवडतं. पण मालिकेतील कंजूस पोपटलाल खऱ्या आयुष्यात कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. 

पोपटलालची संपत्ती 

मीडिया रिपोर्टनुसार, पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक 15 कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील एका भागासाठी तो चांगलच मानधन घेतो. या मालिकेतील एका भागासाठी तो 60 हजार मानधन घेतो. गेल्या 14 वर्षांपासून या मालिकेच्या माध्यमातून पोपटलाल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत पोपटलालचं लग्न झालेलं नाही. तो लग्नासाठी एका चांगल्या मुलीच्या शोधात असलेलं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. मात्र खऱ्या आयुष्यात पोपटलालचं लग्न झालं आहे. 

मालिकेच्या एका भागासाठी श्याम (Shyam Pathak) 60 हजार रुपये इतकं मानधन घेतात असं म्हटलं जातं. त्यांच्याकडे स्वत:ची अशी आलिशान मर्सिडीज कारही आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. 'जसुबेन जयंती लाल जोशी की जॉइंट फैमिली' या मालिकेतूनही ते झळकले होते.

संबंधित बातम्या

'तारक मेहता...'मधील 'पत्रकार पोपटलाल'कडे खऱ्या आयुष्यात आहे 'ही' आलिशान कार